वासनांध विकृत मामाच्या करामती! स्वयंपाकासाठी घरी बोलवून अल्पवयीन सख्या भाचीवर केला बलात्कार! आता होणार भाचीच्या बाळाचा बाप! मोताळा तालुक्यातील खळबळजनक घटना

 
kraim
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  नात्याला काळीमा फासणारी घटना मोताळा तालुक्यातील एका गावात समोर आली आहे. वासनांध, विकृत मामाने स्वतःच्या सख्या १४ वर्षीय भाचीला स्वतःच्या वासनेचा शिकार बनवले. तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात बलात्कारी मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मोताळा तालुक्यातील एका गावात हा प्रकार समोर आलाय. ३० वर्षीय बलात्कारी मामा स्वतःच्या भाचीला वेगवेगळ्या बहाण्याने अनेकदा घरी बोलवत होता. घरी कुणी नसल्याची संधी पाहून त्याच्यातला राक्षस जागृत होत होता. त्यानंतर अतिशय निर्दयीपणे तो भाचीवर बलात्कार करायचा. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारीन अशी धमकी देखील त्याने भाचीला दिली होती.

धमकीमुळे पीडित मुलीने घडला प्रकार कुणाला सांगितला नाही. मात्र दोन दिवसांआधी पीडित मुलीला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला दवाखान्यात नेल्यानंतर तपासणीअंती ती गरोदर असल्याचे समोर आले. त्यामुळे मुलीच्या आईने विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर घडला प्रकार समोर आला. त्यानंतर तातडीने पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून बलात्कारी मामाला पोलिसांनी अटक केली आहे.