प्रेमविवाह फसला..! त्याच्याशी पळून जाऊन लग्न केले पण ६ महिन्यांत झाला सत्यानाश; त्रासाला वैतागून गळफास घेतला!मोताळा तालुक्यातील घटना

 
lagn
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  ज्याच्याशी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले, त्यानेच तिच्या आयुष्याचा सत्यानाश केला. त्याने एवढा त्रास दिला की ६ महिन्यांतच तिने राहत्या घरात गळफास घेतला.मोताळा तालुक्यातील पिंपळखुटा बु येथे ही खळबळजनक घटना घडली. 

प्राप्त माहितीनुसार उर्मिला सागर उमाळे(१९) असे मृतक विवाहितेचे नाव आहे.  उर्मिलाचे पिंपळखुटा येथील सागर उमाळे याच्याशी प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र उर्मिलाच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे उर्मिलाने घरच्यांच्या विरोधात जाऊन मे महिन्यात लग्न केले.  मात्र लग्नानंतर सागरच्या स्वभावात बराच बदल झाला.

तो दारू पिऊन घरी यायचा, उर्मिलाला मारहाण करायचा. तुझ्या खात्यातील पैसे काढून दे असा तगादा त्याने तिच्याभोवती लावला.या त्रासाला वैतागून तिने १९ नोव्हेंबरला गळफास घेतला. उर्मिलाच्या आईने बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून उर्मिलाचा पती सागर व सासू सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.