लव जिहाद,धर्मांतरण कायद्यासाठी होणार 'जनआक्रोश' ! सकल हिंदू समाजाचा २ जानेवारीला बुलडाण्यात मोर्चा; कालीचरण महाराज, धनंजय देसाई येणार

 
maharaj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लव जिहाद,धर्मांतरण कायदा व्हावा तसेच गोवंश हत्याबंदीची प्रशासनाकडून कठोर अंमलबजावणी व्हावी, थोर महापुरुषांवर टीका टिपणी करू नये,यासाठी अटकाव म्हणून राज्यात व केंद्रात कायदा व्हावा या आग्रही मागणीसाठी २ जानेवारीला जिल्हा कचेरीवर सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे.

राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा २ जानेवारीला सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. मोर्चा टिळक नाट्य क्रीडा मंदिर येथून निघणार आहे. प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल.

दरम्यान मोर्चाचे रूपांतर एका सभेमध्ये होणार आहे. या सभेला हिंदुत्ववादी विचारसरणीचे धनंजय भाई देसाई, कालीचरण महाराज, हभप बाबुराव महाराज वाघ, विश्व हिंदू परिषदेचे धर्म जागरण प्रमुख अटल पांडे, बजरंग दलाचे प्रांत सुरक्षा प्रमुख संतोष गहिरवाल, ज्योत्स्ना नागरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थितांना संबोधित करतील. जिल्ह्यातील मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहे. हिंदुत्ववादी नागरिकांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.