लोणार वासियांना उद्या घेता येणार श्रींचे दर्शन! उद्या लोणार शहरात येणार पंढरीवरून परतणारी पालखी!

 
mauli
लोणार ( प्रेम सिंगी;बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शेगावीचा राणा संत श्री. गजानन महाराज  यांची पालखी उद्या म्हणजेच २८ जुलैला लोणार शहरात येणार आहे. पृथ्वीवरील भुवैकुंठ असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनानंतर ही पालखी आता परतीच्या प्रवासात आहे.

किनगाव जट्टू - किन्ही या मार्गाने दिंडी मार्गक्रमन करत  लोणार शहरात उद्या दुपारी चार वाजे दरम्यान दाखल होणार आहे. यावेळेस प्रथमच संत गजानन महाराज दर्शन सोहळा, वारकऱ्यांचा विसावा शेगाव -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी रोड येथे बायपास जवळ निर्माणाधीन दि ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालय येथे होणार आहे. पालखी पंचायत समिती जवळील स्वातंत्र्य मैदानातून निघत पोलीस स्टेशन लोणार - जामा मस्जिद चौक, बस स्टॅन्ड चौक वरून शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरून हिरडव चौक खटकेश्वर नगर लोणी बायपास वरून दि ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालय लोणार येथे विसावा घेणार आहे.

 येथेच भाविकांना संत गजानन महाराज यांच्या दर्शनाचा सोहळा अनुभवता येईल.  याच ठिकाणी वारकऱ्यांचे रात्रीची मुक्कामाची सोय करण्यात आली आहे तरी या बदलाची सर्व गजानन महाराज भक्तांनी नोंद घेण्यात यावी असे आवाहन या पालखीचे सेवेकरी विलास भागवतराव इरतकर, करण कैलासराव इरतकर परिवारातर्फे करण्यात आले आहे.