शेकडो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांनी चुना लावणारा लबाड संतोष रणमोडे गजाआड! जप्त केली एवढी रोकड!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांची सोयाबीन व शेतमाल घेऊन खोटे चेक देऊन चिखली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांनी चुना लावणारा लबाड संतोष रणमोडे याला आर्थिक गुन्हे  शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून  ४१ लाख रुयांची   रोकड आतापर्यंत पोलिसांनी हस्तगत केली आहे.

चिखली पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून रणमोडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याआधी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी एसपीची भेट घेऊन रणमोडे विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. स्वाभिमानीचे संतोष परिहार यांनीसुद्धा याकामी शेतकऱ्यांची एकजूट करण्यासाठी पुढाकार घेतला होता. अखेर चिखली पोलिसांनी लबाड रणमोडे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यासाठी पथके नियुक्त केली होती.  आर्थिक गुन्हे शाखेचे पथक रणमोडेच्या मार्गावर होते. त्याच्या ताब्यातून  ४१ लाख रुपयांची   रक्कम जप्त केली असली तरी पोलिसांना अजून बरीच रक्कम त्याच्या ताब्यातून हस्तगत करायची आहे.

काय आहे प्रकरण

चिखली तालुक्यातील पाचशे ते साडेपाचशे शेतकऱ्यांचा शेतमाल संतोष संतोष रणमोडे ने खरेदी केला होता. त्यानंतर शेतकऱ्यांना खोटे चेक संतोष रणमोडे फरार झाला होता. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात १२० तर चिखली पोलीस ठाण्यात १६१ अशा २८१ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या.  अजूनही बहुतांश शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल न केल्याने ही फसवणूक अंदाजे १९ कोटीपेक्षा जास्त असावी असा अंदाज आहे. दरम्यान चिखली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार  ३ कोटी ४१ लाख ४२ हजार ५०५ रुपयांची फसवणूक झाली आहे.