बिबट्याने ही केली "कर" साजरी! ९ बकऱ्यांचा फडशा पाडला; सिंदखेडाजा तालुक्यातील घटना

 
hfj
सिंदखेडाजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): श्रावण संपताच एका बिबट्याने सुद्धा "कर" धमक्यात साजरी केली. सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरखेड येथील एका शेतकऱ्याच्या ९ बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

पांगरखेड येथील कैलास भाऊराव शिंगणे यांच्या शेतात त्यांचा बकऱ्यांचा गोठा आहे. शेतकरी शिंगणे यांनी काल, सकाळी बकऱ्या गोठ्यासमोरील ओसरीत बांधल्या व ते घरी गेले. ९ वाजता ते पुन्हा शेतात परत आले असता त्यांना बकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे समजले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तब्बल ९ बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.