एलसीबीने पकडला ६३,५५० रुपयांचा गुटखा! बंदीनंतरही गुटखा विक्री 'ओक्के' मध्येच !

एका आरोपीला ताब्यात घेऊन ६३,५५० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. शेख इरफान शेख गुलाब नबी असे आरोपीचे नाव आहे.
राज्यात बंदी असलेला पण परराज्यात उत्पादीत होणारा गुटखा, सुंगधी तंबाखू आदी पदार्थ पोलिस व अन्न औषधी प्रशासन अधिकारी पकडतात. तरीही शहरासह जिल्ह्यातील पान टपऱ्यांवर हाच गुटखा अगदी सहजतेने उपलब्ध होतो. पोलिसांच्या हाती लागणारा गुटखा सापडतो.तो विकणाऱ्यांवर कारवाई पण होते, मात्र त्याची विक्री तरीही थांबत नाही.असे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून दिसत आहे. या प्रतिबंधित गुटख्याकडे आता एलसीबीने मोर्चा वळविला आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशावरून देऊळगाव राजा पोलीस ठाणे हद्दीतत देऊळगाव मही येथे कारवाई करण्यात आली. आरोपी शेख इरफान शेख गुलाब नबी त्याच्या ताब्यातून विमल, राजनिवास, गोवा, नजर अशा विविध कंपनीच्या गुटखा पुड्या आढळून आल्या. एकूण ६३,५५० रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी विरुद्ध कलम ३२८,१८८,२७३ भादंवि सह कलम अन्नसुरक्षा मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल मनीष गावंडे, ओमप्रकाश सावळे, सुधाकर काळे, दीपक लेकुरवाळे, सुनील खरात,दिगंबर कपाटे, दीपक वायाळ, सरिता वाकोडे, राहुल बोर्डे यांनी केली.