पतंग काढणे जीवावर बेतले! बुलडाण्यात १४ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू! वावरे ले आऊट मधील घटना..!!

 
hggh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संक्रांत जवळ आली की पतंग उडविण्याचे वेध लागतात. परंतु हे पतंग जीवावरही बेतू शकते. १४ डिसेंबरला येथील वावरे ले आऊट मध्ये राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाचा ११ केव्हीच्या डीपी वरील तारेवरून पतंग काढताना जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रणव विनोद बोरकर असे मृतक मुलाचे नाव आहे.

बुलडाणा शहरातील वावरे ले आऊट येथील वावरे यांच्या बिल्डिंगचे काम सुरू आहे. प्रणव पतंग खेळत असताना त्याची पतंग बांधकामावरील दुसऱ्या मजल्यावर विद्युत तारेवर अडकली.ही पतंग काढण्यासाठी प्रणव बोरकरने लोखंडी सळी घेतली होती. लोखंडी सळीचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने  अचानक विजेचा शॉक लागून तो खाली कोसळून त्याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच  बुलडाणा शहर पोलिसांनी पोलिस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रणवला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता आणले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मृतदेह शवविच्छेदनाकरिता शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.