"घर का भेदी लंका ढाये" ! घरातल्या तरुणानेच सव्वा लाखाचे दागिने चोरले; पोलिसांनी बरोबर ओळखले;देऊळगाव राजा येथील घटना

 
chor
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा); 'घर का भेदी लंका ढाये' या म्हणीप्रमाणे एकाच फ्लॅटमध्ये एकाच कुटुंबात राहत असताना,सव्वा लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना देऊळगाव राजा पोलिसांच्या निदर्शनात आली आहे. अजय विजय पाटमासे( रा.शिंगणे नगर, देऊळगाव राजा) असे आरोपीचे नाव आहे.

देऊळगाव राजा शहरातील शिंगणे नगर भागातील एकाच फ्लॅटमध्ये राहत असलेल्या कुटुंबातील अजय विजय पाटमासे या तरुणाने संधी साधली. घरातील कपाटातील सोन्याची गहू मण्याची पोत, सोन्याचे कानातले, सोन्याचे सेवन पीस,सोन्याच्या दोन अंगठ्या नाकातील नथ यासह एक लाख २६ हजार रुपये दाग दागिन्याची चोरी केली..

चोरीची तक्रार सौ. रेखा प्रकाश पाटमासे यांनी पोलीसांना दिली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात  पाटमासे यांच्या कुटुंबातीलच अजय विजय पाटमासे याने चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी  आरोपीला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गुंजकर करीत आहेत.