पावसाळ्यात जरा जपूनच..! वीज पडल्याने जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू! दोघे पुरात वाहून देवाघरी; एकाचा अंगावर भिंत पडल्याने मृत्यू! शासनाकडून मिळतो "एवढा" आधार !

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत वीज पडल्याने ९ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला असून अंगावर भिंत पडल्याने एका जणाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय वीज कोसळल्याने अनेक जनावरांचा सुद्धा मृत्यू झालाय. काल, ११ ऑक्टोबरला जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. याशिवाय कालच्या दिवसात वीज पडल्याने दोन जनावरांचा सुद्धा मृत्यू झाला आहे.
सरकारकडून कुटुंबाला मदत....!
दरम्यान आपत्तीमुळे नुकसान झाल्यास नुकसान ग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. नैसर्गिक आपत्तीत मृत्यू ओढवल्यास ४ लाख रुपये, ६० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास २ लाख रुपये , ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ५९ हजार १०० व आठवड्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात रहावे लागल्यास १२ हजार ७०० रुपयांची मदत शासनाच्या वतीने करण्यात येते.