खामगाव तालुक्यातील पारखेडच्या जय ने हद्दच केली; १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून धरला हात अन्....

 
kraim
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठेवून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना खामगाव तालुक्यातील पारखेड येथे समोर आली आहे.  खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. जय विजय यादगिरे (२४) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल, ११ डिसेंबरला १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती. याच संधीचा फायदा जय ने घेतला. तो मुलीच्या घरात घुसला. जबरदस्ती तिचा हात पकडला.  "तू माझ्याशी फ्रेंडशिप कर" असे म्हणत त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्याने जय पळाला. घडला प्रकार मुलीने तिच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.