ते लग्न ठरले शेवटचे! लग्नावरून परततांना फोटोग्राफर तरुणावर काळाचा घाला! ट्रकने उडवले..! आई वडिलांना एकुलता एक होता

 
ghjghj
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लग्नात फोटोग्राफी करून परत येत असताना ट्रकने दुचाकीला उडवल्याने फोटोग्राफर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मालेगाव बायपास वर काल, रात्री ११ वाजता हा भीषण अपघात झाला. अमर गजानन ढोरे(२२, रा.अंजनी बु,ता.मेहकर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार अमर आणि त्याचा मित्र गणेश विजय खडसे(२३) दोघे  वाशिम येथे लग्नात फोटोग्राफी व व्हिडिओ शुटींगसाठी गेले होते. लग्न आटोपून दोघे दुचाकीने परत येत असताना रात्री ११ च्या सुमारास ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात अमरचा जागीच मृत्यू झाला तर गणेश गंभीर जखमी झाला. गणेशवर उपचार सुरू आहेत. अमर त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्यात आई, वडील, आजी असा परिवार आहे. एकुलता एक पुत्र गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.