इश्कवाला मास्तर! पोरांना शिकवायच सोडून शाळेतल्या शिक्षिकेकड टकटक पहायचा! तिच्यासाठी कविता लिहून टाकली व्हॉटस्अप गृपवर ! खामगाव तालुक्यातील घटना

 
kraim
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा भलताच कारनामा समोर आलाय. शाळेत शिकविणाऱ्या विवाहिते शिक्षिकेवर त्याचा चांगलाच एकतर्फी जीव जडला. पोरांना शिकवायच सोडून तो त्या विवाहित शिक्षिकेकडे टकटक पहात बसायचा. तिच्यासाठी चक्क त्याच्यातला कवी जागृत झाला अन् त्याने ती कविता लिहून शाळेच्या व्हॉट्स ॲप गृपवर व्हायरल सुद्धा गेली. या प्रकारामुळे संतापलेल्या पीडित शिक्षिकेने थेट पोलिस ठाणे गाठून सहकारी शिक्षकाची तक्रार दिली.

खामगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक  रोहिदास रामदास राठोड(५२, रा.खामगाव) हा खामगाव तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. पिडीत ३४वर्षीय शिक्षिका सुद्धा त्याच शाळेवर कार्यरत आहे. २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यापासून रोहिदास राठोड ची नियत फिरली.

तो सहकारी पीडित शिक्षिकेसोबत  वाईट उद्देशाने लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. अनेकदा शाळेत तो शिक्षिके कडे टकटक पहायचा. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्या मास्तरने पीडित शिक्षिकेवर एक कविता लिहिली व ती व्हॉट्स ग्रुप वर व्हायरल केली. त्यामुळे पीडित शिक्षिकेने खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून रोहिदास मास्तरविरुद्ध  विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.