इश्कात गद्दारी; "ते" फोटो व्हायरील करण्याची धमकी देत शंभर वेळा इज्जत लुटली! पोरगी २२ वर्षांची अन् बलात्कारी ३० चा! मलकापूर तालुक्यातील घटना

 
malkapur
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रेमात कोण काय करेल याचा नेम नाही..पण हल्ली प्रेम केवळ नावालाच असत, प्रेमाचा बुरखा पांघरून देहाची शिकार करण्याकडे अनेक वासनांध लोकांच्या नजरा लागलेल्या असतात.  "त्या" कामाशिवाय त्यांना दुसर काही सुचत नाही, प्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या त्या फक्त शरिरसुखासाठीच.. त्यातही जर एखाद्या वेळेस तिच्याकडून "त्या" कामासाठी नकार आला की त्याचा पुढचा खेळ सुरू होता.."त्या" कामासाठी तिला ब्लॅकमेल करण्याचेही प्रकार होतात..असाच एक प्रकार मलकापूर तालुक्यातील एका गावच्या २२ वर्षीय तरुणीसोबत घडला आहे. प्रेमाच्या जाळ्यात फसवून आरोपी तरुणाने त्याच्या वासनेची भूक भागवली. "त्या" खाजगी क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ त्याने काढले अन ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याने अनेकदा तिची इच्छा नसताना इज्जत लुटली. 

मलकापूर ग्रामीण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर तालुक्यातील  एका गावातील २२ वर्षीय तरुणी छत्रपती संभाजीनगरात शिकवणी वर्गात शिकत होती. तिथे तिची  भोकरदन तालुक्यातील राजूर गणपती येथील रामकिसन बबन पुंगळे याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. या मैत्रीच्या प्रेमसंबंधांचा फायदा घेत रामकिसन ने तिच्याशी शारीरिक  संबंध प्रस्थापित केले. त्या संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पीडित तरुणीची अनेकदा इज्जत लुटली. काही कालावधीनंतर तरुणी तिच्या गावी आली होती.

दरम्यान रामकिसन १५ जानेवारी ला चक्क तरुणीच्या गावी येऊन घरात घुसला, तिथेही त्याने तिच्याशी नको ते केले. तरुणीचे इंस्टाग्राम खाते त्याच्या मोबाईल वरून लॉग इन करून "ते"
फोटो अपलोड केले..या प्रकारानंतर  तरुणीने मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून रामकिसन विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ६ महिन्यांपासून आरोपी रामकिसन पोलिसांना गुंगारा देत होता. १० नोव्हेंबरला पुण्यातून मलकापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने रामकिसन ला ताब्यात घेत मलकापूरात आणले. त्याला न्यायालयाने १६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.