मरण खरच स्वस्त झालय का? २७ वर्षीय तरुणाने गळ्याभोवती आवळला फास! मलकापूर शहरातील धक्कादायक घटना..!

 
hmkjjh
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मरण खरचं इतकं स्वस्त झालं की काय असा प्रश्न पडावा अशा घटना जिल्ह्यात सातत्याने समोर येतायत. कोण कुठल्या कारणाने आत्महत्या करेल याचा नेम नाही.

जिल्ह्यात चालू महिन्यात १५ दिवसांत १५ आत्महत्यांच्या घटना समोर आल्या आहेत. मलकापूर शहरातील २७ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,१६ जून रोजी उघडकीस आली आहे.

नितीन शंकर रायपुरे(२७, संत ज्ञानेश्वर नगर, मलकापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नितीन ने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. नितीन ने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही. तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.