सतांपजनक! लाज सोडली! सख्या बापाकडून मुलीचा विनयभंग! बाजेवर झोपलेल्या मुलीसोबत वाईट वागला नराधम बाप! नांदुरा तालुक्यातील घटना;गेल्या ११ महिन्यात ६१ बालके वासनेचे बळी

 
kraim
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  खेळण्याबागळण्याच्या वयात लहान मुलांना लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. गेल्या ११ महिन्यात ६१ बालके वासनेचे बळी ठरले. ९ जानेवारीला देखील सख्ख्या बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना बोराखेडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावात मध्यरात्री घडली. पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

      ghube

                  (जाहिरात👆)

 बुलडाणा जिल्ह्यातील लैंगिक अत्याचारांनी विकृतीचा कळस गाठल्याचे दिसून येते. गेल्या ११ महिन्यात १० ते १८ वयोगटातील ६१ बालके लैंगिक अत्याचाराला बळी पडले. परंतु ह्या घटना काही थांबताना दिसत नाही. बोराखेडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावातील ३७ वर्षीय महिलेने बोराखेडी पोलिसात तक्रार दिली की, त्यांची १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही शुक्रवारी ६ जानेवारीला रात्री स्वतःच्या घरात बाजीवर झोपलेली होती.

दरम्यान पीडित मुलीचे वडील (४०) याने रात्री २ वाजताच्या सुमारास स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच सदर घटना कोणाला सांगितल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. दरम्यान पीडित मुलीने नराधम बापाच्या सदर घृणास्पद कृत्य बाबत आईला सांगितले. त्यामुळे हा संताप जनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी विरुद्ध विनयभंग व पोक्सो कायद्यानुसार गून्हा दाखल केला आहे. आरोपी हा बाहेरगावी निघून गेला होता. दरम्यान तपास अधिकारी पीएसआय अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनातील एका पथकाने आरोपीला खामगाव येथून ९ जानेवारीला अटक केली आहे.