भावजयीसोबत अनैतिक संबंध! अडथळा ठरणाऱ्या पत्नीला आयुष्यात उठवण्याचा प्रयत्न! हात पाय धरुन विषारी औषध पाजले! मलकापूर तालुक्यातील भाडगणीची घटना! बुलडाणा जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू

सौ. सविता रोहिदास चव्हाण (३०, रा. भाडगणी) या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार नवरा रोहिदास याचे त्याच्या चुलत भावजयीसोबत अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे तो पत्नीला सातत्याने त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून सविता माहेरी गेली होती. मात्र मध्यस्थानी यापुढे आता असे होणार असा शब्द दिल्याने १५ दिवसांआधी ती भागडणी येथे नांदायला गेली होती. मात्र १५ दिवसांपासून तिचा नवरा फरार होता. १८ तारखेला सकाळी तो घरी आला, यावेळी पत्नी सविता ने इतके दिवस कुठे होता अशी विचारणा केली.
यामुळे संतापलेल्या रोहित ने तू मला विचारणारी कोण असे म्हणत चापटा बुक्क्यांनी बेदम मारले. दिर आणि पुतण्याने हातपाय पकडून सासू व सासऱ्याने उवा मारण्याचे विषारी औषध तोंडात टाकले. याप्रकराने अत्यवस्थ झालेल्या सविताला माहेरच्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्या जबाबा वरून पोलिसांनी तिचा नवरा रोहिदास रामदास चव्हाण, दिर प्रकाश रामदास चव्हाण, पुतण्या प्रताप प्रकाश चव्हाण आणि सविताच्या सासू विरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.