जे करायचं नव्हत ते केलं अन् ८२ हजाराला लागला चुना! वाचा खामगावच्या तरुणाची स्टोरी..!

 
shivajinagar
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. प्रसारमाध्यमांच्या तसेच पोलिसांच्या माध्यमातून अनेक वेळा जनजागृती केली जात असली तरी लोक अशांना बळी पडतच कसे हे काही उलगडत नाही. खामगाच्या मोहम्मद फैजल या तरुणाने सुद्धा जे करायला नको तेच केले त्यामुळे त्याला ८२ हजार रुपयांचा चुना बसला.!

त्याचे झाले असे की, २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता खामगाच्या  शौकत कॉलनीत राहणाऱ्या २७ वर्षीय  मो. फैसल मो. अनिस याला  मोबाईलवर कॉल आला. मी स्टेट बँकेतून अधिकारी बोलतो तुमच्या क्रेडिट कार्ड ची लिमिट वाढवून द्यायची आहे. असे म्हणून तुमच्या बँक खाते व क्रेडिट कार्ड ची संपूर्ण महित्या व तुमच्या मोबाईल वर आलेला ओटीपी द्या अशी गळ त्या फसवणूक करणाऱ्या कडून मो. फैसल मो. अनिस यांना घालण्यात आली.

मो. फसल याने वरील सर्व माहिती देताच त्याच्या क्रेडिट कार्ड मधून ८२ हजार ७२० रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर करण्यात आले. जेव्हा आपली फसवणुक झाली. असे मो. फैसल मो. अनिस याच्या लक्षात आले तेव्हा बुलडाणा सायबर क्राईमला तक्रार देण्यात आली. यावरून २ ऑटोम्बर रोजी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. नि अरुण परदेशी  करीत आहेत.