बायकोच्या विरोधात नवरा बसला उपोषणाला!कारण वाचून तुम्ही म्हणाल "असं कुठ असत का"! नांदूऱ्यातील प्रकार

 
rfhtgjh
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  नवरा बायकोत होणारे भांडण हा काही नवा प्रकार नाही. घरात भांड्याला भांडे लागतातच पण म्हणून बायकोच्या विरोधात थेट कुणी उपोषणाला बसल्याचे तुम्ही पाहिले नसेल..मात्र नांदूऱ्यात एक नवरोबा चक्क बायकोच्या विरोधात उपोषणाला बसलाय..घटस्फोट न घेता माझ्या बायकोने दुसरे लग्न केले, त्यामुळे तिच्याविरुद्ध कारवाई केली अशी मागणी या नवरोबाने केली आहे.
नांदुरा तालुक्यातील राजनगर येथील गणेश मुरलीधर वडोदे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना निवेदन दिले. पत्नीने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले त्यामुळे तिच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र पोलिसांनी तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याने ते काल, २६ मेपासून नांदुरा येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.