तिच्या आईला सगळच माहीत होत! मात्र सगळ घडून गेल्यावर सांगितलं! १७ वर्षीय मुलगी रात्रीतून गायब झाल्यावर आई म्हणाली तिचे गावातील...! खामगाव तालुक्यातील घटना

 
hivarkhed
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातून १७ वर्षीय मुलगी गायब झाली. ती अल्पवयीन असल्याने याप्रकरणी  हिवरखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा  दाखल करण्यात आला. मात्र असे असले तरी गावातीलच एका मुलाशी ती नेहमी बोलत होती हे मुलीच्या आईला माहीत होते. मुलगी निघून गेल्यानंतर मुलीच्या आईने घडला प्रकार आपल्या पतीला सांगितला.

 प्राप्त माहितीनुसार खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात १५ सप्टेंबरच्या रात्री १७ वर्षीय मुलगी आई - वडिलांसह झोपली होती. रात्री ११ वाजता मुलीच्या आईला जाग आली तेव्हा मुलगी दिसली नाही. त्यामुळे घरातील सगळ्यांना उठवून मुलीचा शोध सुरू करण्यात आला, मात्र मुलगी मिळाली नाही. गावातील स्वप्नील नावाच्या मुलासोबत मुलगी नेहमी बोलत होती, तोही तिच्यासोबत बोलायचा असे मुलीच्या आईने मुलीच्या वडिलांना सांगितले.
   
  मुलीच्या आईवडिलांनी स्वप्नीलच्या घरी जाऊन बघितले असता स्वप्नील सुद्धा घरी नव्हता. त्यामुळे स्वप्नील यानेच आमच्या मुलीला फुस लावून पळवून नेले असे मुलीच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून स्वप्नील विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.