हृदयद्रावक..! झोका खेळता खेळता फास लागला, मुलाचा मृत्यू! खामगावातील घटना..!
Nov 29, 2022, 18:22 IST

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): झोका खेळता खेळता फास लागल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. खामगाव शहरातील जुनाफैल भागात आज,२८ नोव्हेंबरला दुपारी ही घटना घडली.
शंकर प्रसाद शिंदे(१४, रा. जुनाफैल, खामगाव) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शंकर आज दुपारी घरात झोका खेळत होता. झोका खेळता खेळता अचानक त्याला झोक्याचा फास लागला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला तातडीने खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.