हृदयद्रावक! लहान भावाचा अपघात झाल्याची बातमी कानावर पडताच मोठ्या भावाला हार्ट अटॅक;दोघेही देवाघरी ! खामगाव तालुक्यातील वझरची घटना

 
hvhg
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रामाच्या पायात काटा घुसला की लक्ष्मणाच्या पायातून रक्त निघायचे अशी बंधुप्रेमाची कथा आजही सांगितल्या जाते. खामगाव तालुक्यातील वझर येथील दोन भावांच्या जीवापाड प्रेमाची कथाही आता अशीच सांगितल्या जाईल. लहान भावाचा अपघात झाल्याची बातमी मोठ्या भावाला कळताच त्याचा हार्ट अटॅक ने मृत्यू झाला.दरम्यान दोन्ही भावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाइकांवर आली.

खामगाव तालुक्यातील वझर येथील प्रेमसिंग चरमु बटवाडे (५०) हे कामानिमित्त मुंबईत राहत होते.त्यांचा मुंबई येथे अपघात झाला व त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला  लहान भावाचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मोठा भाऊ बालाराम चरमू बटवाडे (७२) यांनाही त्याच दिवशी रात्री हृदयविकाराचा झटका आला त्यांचाही रात्री मृत्यू झाला. दरम्यान लहान्या भावाचा मृतदेह गावात आणल्यानंतर दोन्ही भावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.