तडीपार असताना बिनधास्त शेगावात फिरत होता! पोलिसांनी घातली झडप..!!

 
kraim2
शेगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तडीपार असताना सुद्धा शेगावात बिनधास्त फिरणाऱ्या गुंडाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अजय सुखदेव तायडे(२४, रा.म्हाडा कॉलनी शेगाव) असे या गुंडाचे नाव आहे.
गुंड प्रवृत्तीच्या अजय सुखदेव तायडे याला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्याला पोलिसांनी जिल्ह्याबाहेर सोडून दिले होते. मात्र त्यानंतर तो पुन्हा जिल्ह्यात आला. शहरातील लहुजी वस्ताद चौकात तो फिरत असल्याची माहिती शेगाव शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले व त्यांच्या टीमने गुंडावर झडप घालून त्याला अटक केली.