तिचे आईवडील बाहेरगावी गेल्याची त्याने साधली संधी! घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून इज्जत लुटली.! मोताळा तालुक्यातील खळबळजनक घटना..!!

 
kraim
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून २४ वर्षीय तरुणाने तिच्यावर तोंड दाबून बलात्कार केला. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात ही खळबळजनक घटना घडली. त्याचवेळी मुलीची आई घरी आल्याने  ह्या प्रकरणाचा भांडाफोड झाला असून याप्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात बलात्कारी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्याला अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीचे आईवडील बाहेरी गेले होते. ही संधी साधून गावातीलच २४ वर्षीय वासनांध तरुण अनिकेत उर्फ अजय प्रकाश जाधव हा १५ जुलै रोजी दुपारी मुलीच्या घरात घुसला. मुलीला  पकडुन त्याने तिचे तोंड दाबले अन् जबरदस्ती संभोग केला. तेवढ्यात मुलीची आई घरी आल्याने आरोपी अनेकेतने पळ काढला . घडला प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर लगेच पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली.

तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अनिकेत विरुद्ध पोस्को सह बलात्काराचा गुन्हा दाखल केला. लगेच पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी पावले उचलत आरोपीला काही तासांच्या आत गजाआड केले. याप्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत ममताबादे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आशिष गद्रे करीत आहेत.