शौचास जाणाऱ्या तरुणीचा हातात हात धरला अन् म्हटले आय लव यू! हाताची पप्पीही घेतली.देऊळगावराजाची घटना

 
kraim
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शौचास जात असलेल्या तरुणीचा हातात हात धरून आय लव यू म्हणत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी शहरातील पिंपळनेर भागातील आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. संभाजी सर्जेराव नन्नवरे असे आरोपीचे नाव आहे.

रोडरोमिओ यांचा सर्वत्र सुळसुळाट आहे.संधी भेटेल तेथे हे टपोरी तरुणींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. काही रोमिओ तर हद्दपार करतात. देऊळगाव राजा शहरातील संभाजी नन्नवरे (30) याने देखील हद्द पार केली.एका 19 वर्षीय तरुणीचा 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास एकटेपणाचा फायदा घेत तीला आवाज देऊन थांबविले आणि थेट हात धरला.

तिचा नकार असताना सुद्धा तिला आय लव यू म्हणून टाकले. 'माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे' असे म्हणून सदर तरुणीचा हातात हात घेऊन तिच्या हाताची पप्पी घेऊन तिचा विनयभंग केला,अशा आशयाची तक्रार पीडित तरुणीने देऊळगाव राजा पोलिसांना दिली आहे. तक्रारीवरून पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गुंजकर यांनी सदर आरोपीविरुद्ध अपराध नंबर 468/2022 कलम 354,354 (अ) 504, 506, भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.