१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याची वाईट नजर पडली अन्...चिखली तालुक्यातील खळबळजनक घटना

 
amdapur
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. मुलगी, महिला या केवळ उपभोगाच्या वस्तू आहेत असे मानणाऱ्यांकडून या अत्याचाराच्या घटना घडतात. अल्पवयीन मुलींवर सुद्धा या वासनांध लोकांची नजर पडल्यावर अनर्थ घडतो. असाच प्रकार चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात घडलाय. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका नराधमाने विनयभंग केलाय. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० सप्टेंबरच्या दुपारी ही घटना घडली. आरोपी शरद माणिकराव गवई याची तिच्यावर वाईट नजर होती. दुपारी गावात वर्दळ कमी असल्याची संधी साधत त्याने "त्या" उद्देशाने मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने कशीबशी सुटका करून घेतली. संध्याकाळी घडला प्रकार तिने आईवडिलांना सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग शिंदे करीत आहेत.