प्रवचन ऐकण्यासाठी तिला घरी बोलावले अन् भर दुपारी बेडरूम मध्ये नेऊन बलात्कार! अकरावीत शिकणारी मुलगी प्रेग्नेंट; २३ वर्षांचा तरुण आता भोगणार पापाची फळे!

 
kraim
अकोला (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): तो २३ वर्षांचा तरुण..गल्लीतल्या लोकांना तो धार्मिक वृत्तीच्या वाटायचा..पण त्याच्या मनात मात्र भलतचं काही होत..१५ - १६ वर्षांच्या कोवळ्या वयातील मुलींवर त्याची वाईट नजर होती..त्यातूनच एका मुलीचा उपभोग घ्यायचा हे त्याने मनाशी ठरवले..एक दिवस भर दुपारी गल्लीत राहणाऱ्या अकराव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला त्याने प्रवचन ऐकण्याच्या बहाण्याने घरी बोलावले..त्याच्या घरी तेव्हा कुणीच नव्हे..तिला थेट बेडरूम मध्ये नेऊन तिच्यावर बळजबरी बलात्कार केला.. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली..त्यानंतर वांरवार हा प्रकार सुरू होता..त्यातून व्हायचा तो परिणाम झाला..मुलगी गर्भवती राहिली..! 

अकोला शहरातील एका नगरात हा प्रकार समोर आलाय. पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागल्यानंतर तिला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिचा गर्भपात झाल्याचे समोर आल्यानंतर तिच्या आईवडिलांना धक्का बसला..तिने यामागची हकीकत सांगितल्यानंतर अकोल्यातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात आरोपी तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
    
ऍसिड टाकण्याची धमकी देत बलात्कार

 पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने ऍसिड टाकण्यासाठी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सतत तो तिला घरी बोलावत होता व वारंवार अत्याचार करीत होता. बदनामीच्या भीतीपोटी तिने ही बाब कुणाला सांगितली नव्हती.  काही महिन्यांनी ती गरोदर राहिल्याचे कळल्यानंतर त्याने तिला घरी बोलावले. आरोपीच्या आईवडिलांनी तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या..त्यानंतरच रक्तस्राव सुरू झाल्याने तिच्या पोटात दुखु लागले..रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर साऱ्या प्रकरणाचा भांडाफोड झाला..
  
आरोपी भोगतोय पापाची फळे

 गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगवान तपास करत आरोपी तरुणाला गजाआड केले. न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीअंती दोष सिद्ध झाल्यानंतर आरोपी तरुणाला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.