बायकोसोबत अनैसर्गिक संभोग करायचा! वैतागलेल्या बायकोने पोलीस ठाण्यात धाव घेतली! विकृत नवऱ्याला अटक! बुलडाणा शहरातील घटना

 
chal
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बायकोसोबत जबरदस्ती अनैसर्गिक संभोग करणाऱ्या विकृत नवऱ्याला बुलडाणा शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पिडीत बायकोने गेल्या महिन्यात बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली होती.

विशेष म्हणजे या नवऱ्याने लग्न होण्याआधी लग्न जुळविण्यासाठी खोट्या खोट्या गोष्टी सांगितल्या होत्या. माझ्या वडिलांची फॅक्टरी आहे, मला १लाख ४० हजार रुपये पगार आहे असे सांगून त्याने लग्न जमवले होते. मात्र लग्नानंतर ना कुठली फॅक्टरी ना पगार, नवरा तर आईबापांच्या जीवावर जगतोय असे पत्नीच्या लक्षात आले.  समर संजू उदास(३०) असे या विकृत पतीचे नाव आहे. लग्नानंतर त्याने बायकोसोबत जबरदस्ती अनैसर्गिक संभोग केला. दररोज तो त्यासाठी तगादा लावत होता. तिने सासू सासऱ्यांना सांगितले मात्र सासू सासऱ्यांचा या कृत्याला पाठिंबा होता असे तिने तक्रारीत म्हटले आहे. 

पिडीत विवाहितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. बुलडाणा पोलिसांनी चौकशीअंती काल, विकृत नवऱ्याला पुण्यातून उचलून आणले. न्यायालयाने त्याला २३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.