गुरुजींचेच तोंड काळे! शिक्षिकेला लाचखोर मुख्याध्यापकाने मागितली २ हजारांची लाच! लाच घेतांना रंगेहाथ पकडला! खामगाव तालुक्यातील आवार येथील घटना

 
dfht
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेला त्याच शाळेच्या लाचखोर मुख्याध्यापकाने २००० हजारांची लाच मागितली. मुख्याध्यापकाकडे एका खाजगी व्यक्तीने माहितीच्या अधिकारात शिक्षकांच्या घरभाड्यासंदर्भात माहिती मागितली होती. मी सत्य माहिती सादर करणार नाही पण त्यासाठी २ हजार रुपये द्या अशी मागणी मुख्याध्यापकाने शिक्षिकेकडे केली होती. याप्रकरणाची तक्रार एसीबीकडे येताच एसीबी ने लाचखोर मुख्याध्यापकाला लाच घेतांना रंगेहाथ पकडले. आज, २५ जुलै रोजी खामगाव तालुक्यातील आवार येथील जिल्हा परिषद उच्च मराठी प्राथमिक शाळेत ही कारवाई करण्यात आली.

नरहरी विश्वनाथ टिकार (५४, रा.अभय नगर, घाटपुरी नाका,बुलडाणा) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्तीचे शेवटचे ४ वर्ष उरलेले असताना या लाचखोर गुरूजीने ही करामत केली आहे. प्राप्त माहितीनुसार एका खाजगी व्यक्तीने शिक्षकांच्या घरभाड्याबाबत माहितीच्या अधिकारात मुख्याध्यापकांना माहिती मागितली होते.  सत्य माहिती सादर न करण्यासाठी या लाचखोर मुख्याध्यापकाने शिक्षेकेला २ हजार रुपये मागितले. मात्र शिक्षिकेला लाच द्यायची नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारीची सत्यता पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज जिल्हा परिषद शाळेच्या आवारात साफळा रचला आणि लाच घेतांना लाचखोर मुख्याध्यापक टिकारे याला रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी, पोहेकॉ विलास साखरे, पोना विनोद लोखंडे, महिला पोलीस कर्मचारी स्वाती वाणी, चालक पोना नितीन शेटे यांनी केले.