सासुरवाडीत जाऊन जावयाची विहिरीत उडी घेत आत्महत्या! चिखली तालुक्यातील रोहडा गावची घटना

 
andhera
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सासुरवाडीत गेलेल्या जावयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चिखली तालुक्यातील रोहडा येथे घडली.  भगवान भिवसिंग शिराळे (४०) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 
   

प्राप्त माहितीनुसार रोहडा येथील  बालाराम बिजुरे यांच्या मुलीचे लग्न देवपूर येथील भगवान शिराळे याच्याशी झाले होते. मात्र जावयाच्या घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने ते कुटुंब सासुरवाडीत रोहडा येथे अधिक काळ राहत होते.  १५ दिवसांपूर्वी भगवान शिराळे सासुरवाडीत आले होते. शिराळे यांना दारूचे व्यसन असल्याने पती पत्नीत नेहमी वाद होत होते.दरम्यान काल, सकाळी दारूच्या नशेत असताना ते घराजवळच्या विहिरीजवळ गेले. तिथे गावातील काही महिला पाणी भरत होता व धुणे धुत होत्या. महिलांनी त्यांना बाजूला जा म्हटले मात्र त्यांनी काहीही न ऐकता विहिरीत उडी घेतली.
  
   महिलांनी आरडाओरड केली असता काही तरुणांनी धाव घेतली मात्र तोपर्यंत शिराळे पाण्यात बुडाले होते. अखेर गळाच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.