५ लाख दे नाहीतर मर्डर करीन,शेगावात व्यापाऱ्याला धमकी!

 
jbhj
शेगाव( ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शेगाव शहरातील एका व्यावसायिकाला मोबाईलवरून ५ लाख रुपये खंडणी मागण्यात आली. न दिल्यास मर्डर करण्याची धमकी दिली. ही घटना २० दिवसांपूर्वी घडली असली तरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करायला तब्बल २० दिवस लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शेगाव शहरातील व्यावसायिक बबन उर्फ शंकरलाल लीलाधर भुतडा (६१) यांना २४ ऑगस्ट  एका मोबाईल क्रमांकावरून खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर खंडणी न दिल्यास दुसऱ्या एका मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअपवर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. २६ ऑगस्ट रोजी भुतडा यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यावेळी पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला. त्यामुळे श्री भुतडा यांना मानसिक धक्का बसला.
   
 या प्रकारानंतर शेगाव शहरातील नागरिकांनी  खंडणीखोराविरुद्धा कारवाई  करून भुतडा यांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन तहसिलदरां मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना दिले. या निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  खंडणी मागणाऱ्या विरुद्ध दखल पात्र गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर याप्रकरणी तब्बल २० दिवसानंतर दखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला.