तलवार घेऊन दहशत माजवणारा गजाआड!; एलसीबीची कारवाई, ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 
jyh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यासह शहरात भाईगिरी वाढत आहे. त्या पाठोपाठ चाकू,तलवार असे शस्त्र बाळगण्याची क्रेझ सुध्दा वाढली आहे.10 डिसेंबरला हातात तलवार  घेऊन दहशत माजवणाऱ्या शहरातील एकाला एलसीबी पथकाने ताब्यात घेतले. सुनील उर्फ लेमन संजय काळे (29) रा.वार्ड नंबर 2 बुलडाणा, असे आरोपीचे नाव आहे.त्याचे विरुद्ध विविध गुन्हे दाखल असून पोलिसांनी एकूण 57300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

10 डिसेंबर रोजी एलसीबीचे पथक गस्त घालत असताना, सुनील उर्फ लेमन संजय काळे हातात तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची त्यांना गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेउन त्याचेवर आर्म ऍक्ट 4/25 व सहकलम 135 मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई केली. आरोपीची अधिक चौकशी केली असता, सदर आरोपी विरुद्ध बोराखेडी पोलीस स्टेशन येथे कलम 394, 34 आयपीसी दाखल आहे. शहर पोलीस ठाण्यात देखील कलम 395, 337 आयपीएस मध्ये तो पोलिसांना पाहिजे होता. एलसीबीने आरोपीला शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी,
अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख बळीराम गीते यांच्या आदेशाने करण्यात आली. सपोनी मनीष गावंडे,स.फौ. गजानन माळी, पोहेकॉ राजेंद्र अंभोरे, श्रीकृष्ण चांदुरकर, दिनेश बकाले, अमोल शेजोळ, अजिस परसूवाले,सरिता वाकोडे यांचा कारवाई पथकामध्ये समावेश होता.

3 ठाण्यातील पोलिसांना हवा होता आरोपी! 

आरोपी सुनिल काळे विरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात 394, 34 गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यात वापरलेली 1 मोटरसायकल,1 चाकू,1 तलवार,5 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा आरोपी बोराखेडी, बुलडाणा व  शिंधवा  सिटी,जिल्हा बरवाडा (मध्यप्रदेश) पोलिसांना पाहिजे होता. एलसीबीने त्याला गजाआड केले आहे.