बापाच्या फोन पे वरून आधी प्रियकराला पैसे पाठवले! नंतर त्याच्यासोबत गेली पळून; मुलीच्या वडिलांची अपहरणाची तक्रार! खामगावच्या G.S कॉलेज मध्ये शिकत होती पोरगी!

त्याच झालं अस की खामगाव येथील जीएस कॉलेज मध्ये प्रथम वर्षाला शिकत असलेल्या मुलीचे वय अजून १८ वर्ष पूर्ण नाही. ती काल, ११ ऑक्टोबरला सकाळी कॉलेजला गेली मात्र नेहमी प्रमाणे कॉलेज सुटल्यावर ती काही घरी परतली नाही. मुलीच्या वडिलांनी मैत्रिणीकडे चौकशी केली असता दुपारी दोन पर्यंत ती कॉलेज मध्ये होती मात्र त्यानंतर ती दिसली नसल्याचे सांगण्यात आले. मुलीच्या कुटुंबीयांनी सगळीकडे शोध घेऊनही मुलगी सापडली नाही.
दरम्यान मुलीच्या वडिलांनी स्वतःचा मोबाईल तपासला असला त्यावरील फोन पे मधून एका व्यक्तीला दोनदा ५ हजार असे १० हजार रुपये पाठवल्याचे समोर आली. सदर क्रमांकावर मुलीच्या वडिलांनी फोन लावून पाहिला असता ते पैसे खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे येथील सानु तिहीले याला देण्यात आल्याचे समोर आले.
तुमच्या मुलीनेच ते पैसे सानु तिहीले या तरुणाला द्यायचे सांगितले होते असे समोरील व्यक्तीने सांगितले. मुलीच्या वडिलांनी त्याच्याकडून सानु तिहीले याचा नंबर घेऊन त्याला फोन लावून पाहिला मात्र त्याचा मोबाईल सातत्याने बंद येत आहे. त्यामुळे सानु तिहीले यानेच आपल्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीत वरून पोलिसांनी सानु तिहीले या तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.