आधी बाजेखाली घुसला अन् नंतर तिच्या पाठीवर फिरवला हात!;पुढे काय झाले वाचा..खामगाव तालुक्यातील खळबळजनक घटना

 
sdf
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील टाकळी तलाव येथील ४५ वर्षीय महिला अंगणात झोपली असता तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना १ मे च्या रात्री घडली. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी संशयीत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 पिडीत महिलेने दिलेले तक्रारीनुसार १मे च्या रात्री ती पती व मुलाबाळांसह अंगणात बाजेवर झोपली होती. मध्यरात्री गावातीलच  संशयीत रितेश रवींद्र धुरंदर (३५) हा तिथे आला. अंधाराचा फायदा घेत तो महिला ज्या बाजेवर झोपली आहे त्या बाजेखाली घुसला . त्याने महिलेच्या पाठीवर वाईट उद्देशाने हात फिरवायला सुरुवात केली. महिलेला जाग आल्याने तिने बाजेखाली कुणीतरी असल्याचे पतीला सांगितला. पतीने बाजेखाली पाहिल्यावर रितेश दिसला.. मार खाण्याच्या भीतीने रितेश अंधाराचा फायदा घेत पळून गेला असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी रितेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.