खामगावात फटाक्यांच्या गोडाऊनला आग!; लाखोंचे नुकसान ; दोघे जखमी,एका बैलाचा मृत्यू

 
tgjh
खामगाव( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव येथील जनुना शिवारातील एका खासगी फटाक्यांच्या गोडाऊनला काल, २ मे ला दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीत गोदामातील फटाके फुटून खाक झाले. आग विझविण्याचा प्रयत्न करणारे दोघे जखमी तर एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला.

 खामगावतील तलाव रोडवर जनुना शिवारात हे फटाक्यांचे गोडाऊन होते. दुपारी साडेचारला या गोडाऊनला भीषण आग लागली. मोठ्या प्रमाणात स्फोटक फटाके असल्याने फटाक्यांनी पेट घेतला. त्यामुळे जनुना शिवरासह परिसरात फटाके फुटण्याचे आवाज येत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने  खामगाव येथून जनुनाकडे जाणारा रस्ता बंद केला. खामगाव येथील अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले . आग विझवत फटाके अंगावर उडाल्याने दोघे जखमी झाले  तर एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.