आखिर पकडा गया..! हत्यारा पाच महिने होता फरार..

रायपूर पोलीस ठाण्याचे हद्दीतील साकेगाव येथील युवक सचिन मचमल भोसले याची १९ ऑगस्ट रोजी चिखलीवरून येत असताना वाघापूर अंत्री शिवारात त्याची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. मृतकाच्या आईच्या फिर्यादीवरून रायपूर पोलिसानी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.
मात्र अनिल दीपक शिंदे हा फरार होण्यात यशस्वी झाला होता. पोलीस स्टेशन रायपुर येथे आरोपी अनिल दीपक शिंदे याची माहिती मिळाली. दरम्यान रायपूर पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी एक पथक नेमले. आणि या पथकात असलेले पीएसआय गजानन बास्टेवाड, पोलीस हवालदार शांताराम जाधव, पोलीस नाईक अमोल गवई, देविदास दळवी असे धुळे जिल्यातील सोनगीर गावामधील महादेव मंदिराजवळ सापळा रचून गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी अनिल दीपक शिंदे यास ताब्यात घेऊन पोस्टेला आणून हजर केल्याने विद्यमान न्यायालयात सदर आरोपीस पीसीआर कामी रवाना करण्यात आले आहे.