बापा..! आता त लय झालं; चोरट्यांनी चक्क तहसीलदारांचीच गाडी चोरली! देऊळगावराजाची घटना
Sat, 8 Oct 2022

देऊळगावराजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चोरटे कुणाचं काय चोरतील याचा काही नेम नाही. देऊळगावराजात तर चोरट्यांनी हद्दच पार केली अन् चक्क नायब तहसीलदारांची गाडी पळवली. अखेर देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात नायब तहसीलदारांनी तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जाहिरात
नायब तहसिलदार तुळशीराम कुळमेथे हे देऊळगाव राजा तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना विभागात कार्यरत आहेत. शहरातील सिव्हील कॉलनी भागात असलेल्या त्यांच्या निवास्थानाच्या आवारातून चोरट्यांनी त्यांची शाईन कंपनीची गाडी पळवली असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.