वीज कोसळून गाभण म्हैस व बैलाचा मृत्यू! नांदुरा तालुक्यातील नारायणपुरच्या शेतकऱ्यावर कोसळले आभाळ

 
ghytd
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल, गणेश विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक  ठिकाणी नुकसान झाल्याचे वृत्त आहे. नांदुरा तालुक्यातील नारायणपूर येथे वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याच्या एका गाभण म्हशी सह एका बैलाचा मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

 नारायणपूर येथील शेतकरी मधुसूदन दयाराम काटकर( रा. नारायणपुर, ता.नांदुरा) यांच्या शेतात काल, सायंकाळी साडेपाच वाजता वीज कोसळली. त्यामुळे एका गाभण म्हैस व एक बैल असे दोन जनावरे जागीच दगावल्याने शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान झाले. त्यामुळे  शासनाने शेतकऱ्याला तातडीने मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.