फारुख आणि जमील खानच्या निर्दयीपणाचा कळस! ४२ गोवंशीय गुरांना एकाच ट्रकमध्ये कोंबून घेऊन जात होते;खामगाव शहर पोलिसांनी ट्रकसह दोघांना पकडले..!

सर्व ४० जनावरे खामगावच्या लांजुळ येथील गौरक्षणला जमा करण्यात आली आहेत. एका कंटेनरमधून अनेक गुरांना कोंबून वरणगावकडे नेण्यात येत आहे, अशी गुप्त माहिती खामगाव शहर पोलिसांना मिळाली होती. यावरुन पोलिसांनी अकोला बायपासवरील बाळापूर नाका येथे नाकाबंदी करुन कंटेनर क्र. एमपी०४ जीबी६२८८ ला थांबवून पाहणी केली होती. त्यात निर्दयीपणे कोंबून जनावरे घेवून जाण्यात येत होती.
यावेळी पोलिसांनी हे कंटेनर घेवून जाणारे फारुख खा. हाफीज खा (२५), जमील खान जलील खान (३०) दोन्ही मध्यप्रदेश यांना अटक करुन जनावरांचे कंटेनर थेट पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले होते. सर्व जनावरे बाहेर काढण्यात आली. यापैकी २ बैल मरण पावले आहेत. इतर जनावरे जखमी झाली आहेत. त्यांच्यावर उपचार करून ४० जनावरे लांजूळ येथील गौरक्षणला जमा करण्यात आली आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.