शेतकऱ्यांनो सावधान! मळणी यंत्रात एकाचा हात निकामी ! चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा गावची घटना..!

पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. काही पिकांची काढणीपश्चात कामे सुरू असून, त्यात मळणी हे अत्यंत महत्त्वाचे काम असते. पारंपरिक पद्धतीमध्ये हाताने झोडून, बैलाद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने लोंब्या, ओंब्या किंवा शेंगांतून दाणे वेगळे केले जात. मात्र अलीकडे या कामासाठी यंत्रांचा वापर वाढला आहे.
यंत्रामुळे माणसांचे श्रम कमी झाले असून, वेळही वाचत आहे. पूर्वी ज्या कामांना महिन्यांचा कालावधी लागत असे, ती आता काही दिवसांत पूर्ण होत आहे. मळणी यंत्राची (थ्रेशर) कार्यक्षमताही वाढत चालली आहे. अशा वेळी यंत्रांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही वाढलेले दिसते. कोणताही अपघात हा माणसांच्या जीवितहानी (मृत्यू) किंवा जीवितावर कायमस्वरूपी परिणाम करणारा (कायमचे अपंगत्व) असू शकतो. त्यामुळे मळणी यंत्रासोबत काम करताना प्रत्येकाने जागरूक राहून काही खबरदारी घेतली पाहिजे. परंतु अपघाताच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.