रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर! जानेफळजवळच्या पारडीची घटना..!!

 
dukkar
जानेफळ(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  
रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना जानेफळ येथून जवळच असलेल्या पारडी  येथे घडली.  पारडी येथील  शेतामध्ये गुरे चारत  असताना ,रानडुकराने शेतकऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.काल, २८ जुलैच्या दुपारी  २ वाजे दरम्यान ही घटना घडली. जखमी  शेतकऱ्यालावर जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर बुलडाणा व तेथून अकोला येथे रेफर करण्यात आले.

पारडी येथील हिरालाल दासू राठोड (५५) हे शेतकरी त्यांच्या हिवरा खुर्द शिवारातील स्वतःच्या शेतामधील धुऱ्यावर गुरे चारत  असताना होते. त्याचवेळी शेतामधून रानडुकरांचा कळप धावत आल्याने गुरे सैरावैरा पळाली, परंतु उभ्या असलेल्या शेतकऱ्यावर दोन डुकराने हल्ला चढवला.

त्यामुळे डोक्यावर, कपाळावर , उजव्या डोळ्यावर नाकामधील मध्यभागी पाठीला मोठ्या जखमा झाल्या आहेत. वनरक्षक कैलास. बी .धनगर यांना शेतकऱ्यावरील रानडुकराच्या हल्ल्याची माहिती मिळताच जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येवुन शेतकऱ्याची आस्थेने विचारपूस करून पंचनामा केला.