डीपी वर फ्यूज टाकतांना शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू! संग्रामपूर तालुक्यातील घटना
Nov 29, 2022, 10:23 IST

संग्रामपूर: शेतात पाणी द्यायला गेलेला शेतकरी डीपी वर फ्युझ टाकायला गेला असता शॉक लागल्याने मृत्यू झाला. संग्रामपूर तालुक्यातील देऊळगाव येथे ही घटना घडली. प्रवीण शालीग्राम परघरमोर (३२) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्रवीण याच्याकडे असलेल्या ३ एकर बागायती शेतीत हरबरा पेरणी केली आहे. पिकाला पाणी देण्यासाठी तो शेतात गेला होता, मात्र वीज नसल्याने डीपी वर फ्युझ टाकण्यासाठी गेला असता शॉक लागल्याने तो कोसळला. स्थानिक शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी प्रवीण ला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले,मात्र सईबाई मोटे रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्यात पत्नी, २ मुले,आई, वडील ५ बहिणी असा परिवार आहे.