खळबळजनक! खामगावच्या जनुना सापडला युवकाचा मृतदेह! घातपात की आत्महत्या गूढ कायम..!
Updated: Jun 16, 2022, 13:42 IST
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव येथील जनुना तलावात आज, १६ जून रोजी सकाळी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. योगेश देविदास चोपडे(३४, रा.फरशीपुरा, खामगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार आज, १६ जून रोजी खामगाव येथील जनुना तलावाच्या काठावर कुणीतरी चपला काढलेल्या आल्याचे स्थानिकांना दिसले. त्यामुळे कुणीतरी तलावात उडी घेतली असावा संशय लोकांनां आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व शोधमोहीम राबविली. त्यावेळी तलावात ३४ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. योगेश देविदास चोपडे असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. योगेशने आत्महत्या केली की घातपात याबद्दल अजून स्पष्टता नाही. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला आहे.