खळबळजनक! घरात घुसून छेड काढल्याने महिलेची विष प्राशन करून आत्महत्या! मोताळा तालुक्यातील घटना

 
borkhedi
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  घरात घुसून छेड काढल्याने ३५ वर्षीय विष प्राशन करून आत्महत्या केली. मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात २४ जुलै रोजी ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार मोताळा तालुक्यातील एका गावातील गोविंदा सुदाम जाधव याने घरात घुसून विवाहितेची छेड काढली. यावेळी त्याने लगट करण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेमुळे हादरलेल्या विवाहितेने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. बोराखेडी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.