खळबळजनक! प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट! विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या! आधी ९ महिन्यांच्या चिमुकलीचा दाबला गळा! तिचे आईवडील अंत्यसंस्काराला आले

नाहीत; म्हणाले तिचे -आमचे नाते आधीच तुटले! मलकापूर पांग्रा येथील घटना.!

 
gfhg
मलकापूर पांग्रा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  प्रेम विवाह केलेल्या २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याआधी तिने तिच्या ९ महिन्यांच्या चिमुकलीचा गळा दाबला. ही खळबळजनक घटना सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा काल, सायंकाळी येथे घडली. विशेष म्हणजे यात ९ महिन्यांची चिमुकली थोडक्यात बचावली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार मलकापूर पांग्रा येथील निलेश वरकड (२२) हा तरुणी मजुरीसाठी गुजरात येथे गेलेला होता. तिथेच दिपाली नावाच्या गुजराती तरुणीशी त्याची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दिपालीचे कुटुंबीय या लग्नाला तयार नसल्याने तिने पळून जाऊन निलेश शी लग्न केले. त्यानंतर निलेश दिपालीला घेऊन मूळगावी मलकापूर पांग्रा येथे राहत होता. दरम्यान काल, सायंकाळी दिपालीने  नऊ महिन्यांच्या चिमुकल्या गौरीचा गळा दाबल्याने गौरी बेशुद्ध झाली. त्यानंतर चिमुकलीचा मृत्यू झाला असे समजून दिपालीने देखील गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान या प्रकारानंतर चिमुकल्या गौरीला उपचारसाठी रुग्णालयात हलविल्यानंतर ती बचावली असल्याचे समोर आले. 

घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. दिपालीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाची माहिती गावच्या पोलीस पाटलांनी दिपालीच्या आईवडिलांना देखील दिली होती, मात्र तिने पळून जाऊन लग्न केले तेव्हाच तिचे आमच्याशी नाते तुटले असे सांगून तिच्या आईवडिलांनी अंत्यसंस्काराला  यायला नकार दिला. दरम्यान दिपाली ने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समोर येऊ शकले नसले तरी प्रेमविवाहाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.