खळबळजनक.! एकटी घरी जाणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेवर खामगावच्या समीर मोहम्मदची वासनांध नजर पडली! भडभडी जिनमध्ये अंधारात नेऊन इज्जत लुटली

 
jhggh
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २५ वर्षीय विवाहितेची अंधारात नेऊन इज्जत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काल, रात्रीच्या सुमारास खामगाव शहरातील शिवाजीनगर भागातील भडभडी जिनमध्ये हा प्रकार घडला.  समीर मोहम्मद नजीर (२७, रा. जुनाफैल, खामगाव) असे वासनांध बलात्काऱ्याचे नाव आहे.

 प्राप्त माहितीनुसार २५ वर्षीय महिला कामावरून घरी एकटीच परतत होती. त्याचवेळी वासनांध समीर ची नजर तिच्यावर पडली. अंधाराचा फायदा घेत समीर ने  तिचा हात धरून तिला ओढत भडभडी जिनमध्ये ओढत नेले. तिथे चापटा बुक्यांनी मारहाण करून अंधारात तिच्यावर बलात्कार केला. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास जीव मारण्याची धमकी दिली. समीर च्या तावडीतून कशीबशी सुटका करून महिला घरी पोहचली. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून महिलेने तक्रार दिली. तक्रारीवरून बलात्कारी समीर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.