खळबळजनक! नांद्राकोळी पुन्हा हादरले! कोळपणीची पास डोक्यात मारून नवऱ्याने बायकोचा केला खून..!

 
kraim
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): व्यसनाधीन माणूस कधी काय करेल याचा नेम नाही. अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व स्वतः दारूच्या नशेत असणाऱ्या नशेखोर नवऱ्याने पत्नीचा खून केला. बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी येथे ही खळबळजनक घटना आज,८ डिसेंबरच्या दुपारी तीनला घडली. सुनिता गणेश जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी येथील गणेश भागाजी जाधव हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्याविरोधात याआधी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यासंबंधीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला दारू पिण्याचेही व्यसन आहे. व्यसनाधीन असल्याने पत्नी सूनितासोबत त्याचा नेहमी वाद होत होता.

असाच वाद आज ८ डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास झाला. या वादातून गणेशने कोळपणी करण्याच्या पासचे वार पत्नी सुनिताच्या डोक्यात केले. यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सुनिताचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा केला असून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत बुलडाणा ग्रामीण पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.