खळबळजनक! जिल्ह्यात सुपारी घेऊन मर्डर करणारी टोळी! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या प्रियकराच्या पत्नीचा काटा काढण्यासाठी प्रेयसीने मलकापूरच्या तिघांना दिले ३ लाख! गळा चिरून केली निर्दयी हत्या!

 
uguy
मलकापूर (गजानन ठोसर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सुपारी घेऊन एका विवाहित महिलेचा गळा चिरून निर्दयी खून करणाऱ्या तिघांना मलकापूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने बेड्या ठोकल्या. काल, १८ सप्टेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या प्रियकराच्या पत्नीचा काटा काढण्यासाठी प्रेयसीने ३ लाख रुपयांची सुपारी या तिघांना दिली होती. त्यामुळे या तिघांनी १६ सप्टेंबर रोजी मुंबईतील खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुपारी मिळालेल्या "त्या" विवाहित महिलेला गळा चिरून खून केला.

जाहिरात

yadav

 रोहित राजू सोनुने (२२, रा. शिवाजीनगर, मलकापूर), दिपक दिनकर चोखंडे (२५, रा.बेलाड ता. मलकापूर) व त्यांचा साथीदार पंकज नरेंद्रकुमार यादव (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १६ सप्टेंबर रोजी नवी मुंबईच्या खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विवाहित महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासात अनैतिक संबंधातून हा खून केल्याचे समोर आले होते. मृतक महिलेच्या पतीचे बाहेर लफडे होते. त्याला आणि त्याच्या प्रेयसीला सोबत रहायचे होते. मात्र प्रियकराची पत्नी आपल्या संबंधात अडसर ठरत आहे असे वाटल्याने प्रेयसीने प्रियकराच्या पत्नीचा काटा काढायचा प्लॅन रचला.
   
 तिने मलकापूरच्या रोहित राजू सोनोने याला संपर्क केला. त्याच्या साथीदारांना घेऊन तो मुंबईत पोहचला. तिथे प्रियकराच्या पत्नीच्या काटा काढण्यासाठी ३ लाख रुपयांची सुपारी तिने तिघांना दिली. त्यातील २ लाख रुपये आधी व १ लाख काम झाल्यावर देण्याचे ठरले.  दरम्यान सुपारी मिळालेल्या त्या विवाहितेवर नजर ठेवून १६ सप्टेंबर रोजी तिघांनी तिची गळा चिरून हत्या  केली आणि पसार झाले.

मात्र पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करून मृतक विवाहितेच्या पतीसह तिच्या प्रियकराला अटक केली. सुपारी दिल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांचे एक पथक काल, मलकापूरात पोहचले. मलकापूर पोलिसांच्या डी. बी पथकाने बेलाड येथे सिनेस्टाईल पाठलाग करून तिघा आरोपींना पकडुन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण प्रकारामुळे जिल्ह्यात सुपारी घेऊन मर्डर करणारी टोळीच सक्रिय असल्याचे समोर आले आहे.