खळबळजनक! तरुणीचा गळा आवळून खून! नंतर नदीपात्रात फेकला मृतदेह; तरुणीच्या तळहातावर ठीकठिकाणी पेनाने लिहिले आहे "आशिष"! खामगाव तालुक्यातील घटना

 
nhg
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एका अनोळखी तरुणीचे प्रेत २२ नोव्हेंबरला मन नदीपात्रात आढळून आले होते. दरम्यान उत्तरीय तपासणीत त्या तरुणीचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप मृतक तरुणीची ओळख पटली नसून खुनाचा उलगडा सुद्धा झालेली नाही.

शिर्ला नेमाने - नेमाने मेहकर रस्त्यावरील मन नदीपात्रात २२ नोव्हेंबरला एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला होता. हिवरखेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला होता. मात्र तरुणीची ओळख पटली नव्हती. तरुणीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षाचे आहे. दरम्यान घातपाताचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत होता. उत्तरीय तपासणीत पोलिसांच्या संशयावरून शिक्कामोर्तब करण्यात आले असून तरुणीचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान तरुणीच्या डाव्या तळहातावर पेनाने आशिष, आशिष असे लिहिल्याचे दिसत आहे तर उजव्या हातावर एम आणि ममता असे गोंदलेले दिसत आहे. कपाळावर टिकली, भांगात कुंकू , नाकात नथनी, पायात जोडवे असल्याने तरुणी विवाहित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता आशिष,ममता या दिशेने तपास सुरू केला असून हिवरखेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.