खळबळजनक! आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर सावत्र बापाने केला बलात्कार! चिखली शहरातील संभाजीनगरातील घटना!

 
chikhlipolis
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर सावत्र बापाने शेतात नेऊन बलात्कार केल्याची घटना २८ जुलैच्या संध्याकाळी  चिखली शहरातील संभाजी नगर परिसरात घडली. या घटनेमुळे चिखली  शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीस नराधम विकृत आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार पीडित मुलगी चिखली शहरातील संभाजी नगरात राहते . २८ जुलैला संध्याकाळी ती शाळेतून घरी परत येत असताना तिच्या ३८ वर्षीय सावत्र बापाने तिला गाठले. तुझी आई दवाखान्यात भरती आहे असे त्याने तिला सांगितले मात्र तिला दवाखान्यात घेऊन न जाता संभाजीनगर परिसरात असलेल्या एका शेतात नेऊन रक्लच्यावर तोंड दाबून बलात्कार केला.

दरम्यान उशीर होऊनही मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने तिचा शोध सुरू केला. मुलीच्या आईने मुलीच्या वर्गशिक्षकांना संपर्क साधून विचारणा केली असता ती केव्हाचीच  घरी गेल्याचे सांगितले. त्याचवेळी शाळेत हजर असणाऱ्या कर्मचाऱ्याने मुलीच्या आईची अडचण पाहून शोध सुरू केला.  संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मुलगी रडत रडत शाळेच्या दिशेने येताना दिसली. पीडित मुलीचे कपडे चिखलाने भरलेले होते, केसांत गवत व चिखल होता. तिच्या या अवस्थेचे कारण विचारल्यावर तिने घडलेली हकीकत सांगितली.

तातडीने मुलीला घेऊन तिच्या आईने चिखली पोलीस स्टेशन गाठले. घडला प्रकार ऐकून क्षणभर पोलिसही स्तब्ध झाले. तिला तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा नराधम सावत्र बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.